सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींसाठी झाली आरक्षण सोडत
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या सोडतमध्ये अनुसूचित जाती ,जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.कळसुलकर हायस्कूलची दुसऱ्या इयत्तेतील विद्यार्थिनी आरोही अमित अरवारी हिने कलंबिस्त सरपंच पदाची चिट्टी सोडत काढली. प्रवर्गाचे आरक्षण अद्याप पडलेलं नाही त्यामुळे अशा सहा ग्रामपंचायती आहेत की ज्या 2025 साठी या थेट आरक्षित होतील.मात्र माजगाव , दांडेली , गेळे, कोलगाव , चौकुळ, न्हावेली , कास, निगुडे आंबेगाव , कवठणी या ग्रामपंचायतमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्ग आरक्षणासाठी. साठी सोडत काढण्यात आली. तहसीलदार श्रीधर पाटील,निवडणूक निर्णय अधिकारी सौ तारी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही पदाधिकारी सदस्य उपस्थित नव्हते . मात्र शिवसेना-भाजप मनसे या पक्षाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते ,सरपंच उपस्थित होते व काँग्रेस पक्षाने या सोडतकडे पाठ फिरवली.