For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राधानगरीत सरपंचपदाच्या आरक्षणाची घोषणा

05:49 PM Apr 07, 2025 IST | Radhika Patil
राधानगरीत सरपंचपदाच्या आरक्षणाची घोषणा
Advertisement

राधानगरी :

Advertisement

राधानगरी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सन २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीकरिता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या आदेशानुसार हे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, याबाबतचे अधिकृत प्रकटन जारी करण्यात आले आहे.

प्रकटनात नमूद केल्यानुसार, राधानगरी तालुक्यातील एकूण ९८ सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात येणार आहे. यासाठी तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आरक्षित पदांमध्ये अनुसूचित जातीसाठी (SC) ६ (३ महिला), अनुसूचित जमातीसाठी (ST) ० (० महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) यासाठी १३ (५ महिला), आणि सर्वसाधारण गटासाठी ३० (११ महिला) पदे आरक्षित करण्यात आली आहेत.

Advertisement

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि,८ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता राधानगरी येथील पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीसाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसिलदार अनिता देशमुख यांनी केले आहे.
या आरक्षणामुळे आगामी पाच वर्षांसाठी राधानगरी तालुक्यातील कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात या सोडतीकडे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement
Tags :

.