कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हा पंचायतींसाठी आरक्षण जाहीर

03:18 PM Nov 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकूण 50 जागांपैकी महिलांना 18 जागा; एससी, एसटी, ओबीसींनाही पुरेसे आरक्षण

Advertisement

पणजी : राज्य निवडणूक आयोगाने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींसाठी निवडणूक जाहीर केली असून दि. 13 डिसेंबर रोजी राज्यातील 50 जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासंबंधी आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जाती आणि जमातींची लोकसंख्या, अन्य मागासवर्गीय (ओबीसी) यांच्या संदर्भात उपलब्ध डेटा विचारात घेऊन, उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये एससी, एसटी, ओबीसी आणि महिला यांच्यासाठी राखीवता जाहीर केली आहे. आरक्षणाची अधिसूचना जारी झाल्यामुळे आता उमेदवारांच्या निवड प्रक्रियेला गती मिळणार आहे. राज्यभरात यापूर्वीच इच्छुकांकडून तयारी सुरू झालेली असून त्यात भाजपशी संबंधितांचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले आहे. अधिसूचनेनुसार दोन्ही जिह्यांमध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 9 मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्या खालोखाल ओबीसी आणि एससी व एसटी मतदारसंघांचा समावेश आहे.

Advertisement

उत्तर गोव्यातील एकूण 25 मतदारसंघ

उत्तर गोव्यातील एकूण 25 मतदारसंघामध्ये हरमल, मोरजी, धारगळ, तोरसे, शिवोली, कोलवाळ, हळदोणे, शिरसई, हणजूण, कळंगुट, सुकूर, रेईश मागूश, पेन्ह द फ्रान्स, सांताक्रुज, ताळगाव, चिंबल, खोर्ली, सेंट लॉरेन्स, लाटंबार्से, कारापूर-सर्वण, मये, पाळी, होंडा, केरी आणि नगरगांव या मतदारसंघांचा समावेश आहे.

दक्षिण गोव्यातील एकूण 25 मतदारसंघ

दक्षिण गोव्यातील 25 मतदारसंघामध्ये उसगाव-गांजें, बेतकी-खांडोळा, कुर्टी, वेलिंग-प्रियोळ, कवळे, बोरी, शिरोडा, राय, नुवे, कोलवा, वेळ्ळी, बाणावली, दवर्ली, गिर्दोळी, कुडतरी, नावेली, सावर्डे, धारबांदोडा, रिवण, शेल्डे, बार्से, खोला, पैंगीण, सांकवाळ आणि कुठ्ठाळी या मतदारसंघांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article