महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तांदळातील सुक्ष्म प्लास्टिक प्रदुषणाचे भारतात संशोधन

02:08 PM Jan 23, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

भारतामध्ये तांदळाच्या विविध नमुन्यांतून सूक्ष्म प्लास्टिक कणांचा शोध लावणारे महत्त्वपूर्ण संशोधन प्रा. डॉ. अनिल गोरे, प्रा. गोविंद कोळेकर, पिनल भावसार ( PhD संशोधक विद्यार्थिनी) व त्यांच्या सहकार्यांनी साकारले आहे. या अभुतपूर्व संशोधनामुळे भारतामधील तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक व त्यामुळे आरोग्यावरील गंभीर परिणाम समोर आले आहेत. सुक्ष्म कणांमुळे कर्करोग, श्वसन विकार व पचनाशी निगडित विकार उद्भवण्याचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

डॉ. अनिल गोरे हे शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, मुळचे माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते उका तरसादिया विद्यापीठ, तरसादिया इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल सायन्सेस (TICS), सुरत येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले शैक्षणिक जीवन आपल्या गावातून सुरू केले असून, दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित संस्थेत त्यांनी पोस्टडॉक्टरल संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या कार्यामुळे आरोग्यविषयक गंभीर परिणाम समोर आले आहेत. याचा अभ्यासाने पर्यावरण व मानव आरोग्याला धोका दाखवून दिला आहे. डॉ. गोरे यांच्या संशोधन कारकिर्दीत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून त्यांना तरुण वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हे संशोधन जर्नल ऑफ ह्याझार्डस मटेरिअल्स (Journal of Hazardous Materials) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या अभ्यासाद्वारे तांदळातील सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीचा आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

सदरच्या संशोधनामध्ये भारतभरातील विविध तांदळाच्या नमुन्यांचे सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणासाठी विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासात 100 ग्रॅम तांदळामध्ये सरासरी 30.8 ते 8.61 कण सूक्ष्मप्लास्टिक आढळले. हे कण मुख्यत: पारदर्शक फायबर स्वरूपाचे असून, 100-200 मायक्रोमीटर इतक्या आकाराचे होते. संशोधनाने असे दाखवून दिले की, पॉलीएथिलीन (झ्)िं आणि पॉलीएथिलीन टेरेफ्थेलेट (झ्Tिं) या प्रकारचे सूक्ष्मप्लास्टिक कण तांदळामध्ये प्रमुख प्रमाणात आढळतात.

सूक्ष्मप्लास्टिक हे अत्यंत घातक दूषित घटक आहेत, जे मानव आणि पर्यावरणासाठी गंभीर धोका निर्माण करतात. संशोधनात आढळले की, बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या विविध ब्रॅण्ड्समध्ये सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण आढळते. ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्यामध्ये कर्करोग, श्वसन विकार, आणि पचनाशी संबंधित विकार उद्भवण्याचा धोका आहे. विशेषत: महिलांचे सूक्ष्मप्लास्टिक सेवन पुरुष आणि मुलांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले, ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

सूक्ष्मप्लास्टिक कमी करण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना तांदळाच्या लागवडीसाठी आणि साठवणुकीसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. दररोजच्या वापरामध्ये तांदूळ व्यवस्थित पाण्याने किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुण्याने त्यातील सूक्ष्मप्लास्टिक कणांचे प्रमाण कमी होऊ शकत असलयाचे डॉ. गोरे यांनी सांगितले.

संशोधनामध्ये पिनल भावसार (झ्प्अ विद्यार्थी), प्रा. यासुहितो शिमाडा (मिई युनिव्हर्सिटी जपान), प्रा. गोविंद कोळेकर (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापू), प्रा. शशिकांत पटोले (खलीफा विद्यापीठ, यूएई), डॉ. सुमित कांबळे (ण्एश्ण्Rघ्, भावनगर), आणि मंदीप सोलंकी यांचे योगदान लाभले.

सूक्ष्मप्लास्टिक प्रदूषणाच्या ओळखीत भारताला महत्त्वपूर्ण यश मिळवून देणाऱ्या या संशोधनामुळे तांदूळ उत्पादन व आरोग्यासाठी सुरक्षिततेचे नवीन मार्ग उघडले गेले आहेत. पर्यावरणपूरक उपाययोजना आणि शाश्वत जीवनशैली अंगीकारल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो.
                                                                                                          डॉ. अनिल गोरे, संशोधक

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia