For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय नौदलाकडून जहाजाची सुटका

06:07 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय नौदलाकडून जहाजाची सुटका
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सोमाली समुद्री चाच्यांच्या तावडीतून भारतीय नौदलाने एका व्यापारी नौकेची सुखरुप सुटका केली आहे. ही व्यापारी नौका माल्टा या देशाची असल्याचे स्पष्ट झाले आहे. 14 डिसेंबर 2023 या दिवशी चाच्यांनी या नौकेचे तांबड्या समुद्रातून अपहरण केले होते. एमव्ही रुएन असे या नौकेचे असल्याची माहिती आहे.

तांबडा समुद्र आणि अरबी समुद्र या क्षेत्रांमध्ये अलिकडच्या काळात समुद्री चाचेगिरीत मोठी वाढ झाली आहे. प्रतिदिन तीन ते चार व्यापारी नौकांवर हल्ले करुन त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे भारतीय नौदलाने या क्षेत्रातील आपल्या सामर्थ्यात वाढ केले असून आतापर्यंत 12 व्यापारी जहाजांची सुटका केली आहे. ही सर्व जहाजे विदेशी असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय नौदलाच्या 12 युद्धनौका आणि दोन पाणबुड्या या क्षेत्रात नियुक्त करण्यात आल्या असून त्यांनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविले आहे.

Advertisement

14 डिसेंबरला संदेश

अपहरण झाल्याचा संदेश माल्टाच्या व्यापारी नौकेने 14 डिसेंबरला पाठविला होता. त्यानंतर या नौकेच्या सुटकेची योजना बनविण्यात आली. या योजनेनुसार भारतीय युद्धनौकांनी वेगाने हालचाली करुन अपहृत नौकेच्या स्थानाचा शोध घेतला. त्यानंतर चाच्यांना पळवून लावून नौकेची सुटका करण्यात आली. या कामगिरीसाठी दोन आठड्यांचा वेळ लागला, अशी माहिती देण्यात आली आहे

Advertisement
Tags :

.