Kolhapur News : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या अठरा बैलांची सुटका ; गोकुळ शिरगाव पोलिसांची धडक कारवाई
उजळाईवाडीजवळ बैलांची तस्करी रोखली
कोल्हापूर : कत्तलीसाठी कर्नाटक मध्ये खिलारी जातीचे 18 बैल घेवून जाणारा ट्रक गोकुळ शिरगाव पोलिसांनी पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटल समोर रविवार दि.७ रोजी दुपारी पकडला.कत्तलीसाठी नेणाऱ्या आरोपींच्यावर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी जबीउल्ला अब्दुलसाहब शेख (वय ४७ रा. दावणगिरी कर्नाटक) व क्लीनर सादिक ,आयशर वाहन मालक पूर्ण नाव व पत्ता नाही . हे खिलारी जातीचे १८ बैल ट्रकमधून कर्नाटक येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षक यांना मिळाली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी या गाडीचा पाठलाग करून पुणे बेंगलोर महामार्गावर उजळाईवाडी येथे हा ट्रक पकडून आरोपी व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी हे सर्व बैल पोलिसांनी कोल्हापूर येथील पांजरपोळ येथे पाठविले. या घटनेची फिर्याद दीपक रामचंद्र शिंदे निधिलेखा परीक्षक शांतीनगर उंचगाव यांनी दिली आहे.
संबंधित माहिती कळताच गोरक्षकांच्या माध्यमातून भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, अमर गायकवाड शैलेश पाटील, गिरीश साळोखे,निलेश शिंदे, समर्थ लंबे व इतर गोरक्षक, गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे येथे जमून या ट्रक मालकावर व इतर लोकांच्या योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या कडे केली.