कत्तलीसाठी आणलेल्या गायींची सुटका
बेळगाव : गुरुवारी मध्यरात्री शहरातील काही गोरक्षकांनी कत्तल करण्यासाठी आणलेल्या गायी वाचविल्या आहेत.टोपी गल्ली परिसरातून या गायी ताब्यात घेऊन श्रीनगर येथील गोशाळेत पाठविण्यात आल्या आहेत. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तल करण्यासाठी टोपी गल्ली येथे गायी आणल्याची माहिती मिळताच मारुती सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना माहिती देऊन सर्व गायी ताब्यात घेतल्या. सुरक्षितपणे त्या गायी गोशाळेत पाठविण्यात आल्या. गोहत्या टाळण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान कसई गल्ली, कामत गल्ली परिसरातही गोरक्षक कार्यकर्ते व पोलिसांनी गोवंश वाचविले आहेत. कसई गल्ली परिसरात तर शुक्रवारी सायंकाळनंतर प्रमुख मार्गावरुन बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते. बेकायदा गोहत्या रोखण्यासाठी रात्री उशीरापर्यंत पोलिसांचीही गस्त सुरू होती.