For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेपो दर जैसे थे राहणार, रिझर्व्ह बँकेची बैठक 3 एप्रिलपासून

06:46 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
रेपो दर जैसे थे राहणार  रिझर्व्ह बँकेची बैठक 3 एप्रिलपासून
Advertisement

शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

रिझर्व बँक ऑफ इंडियाची द्विमासिक पतधोरण समितीची बैठक 3 एप्रिलपासून सुरू होत असून या बैठकीमध्ये रेपो दर जैसे थे राहणार असल्याचे संकेत वर्तवले जात आहेत.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली व्याजदरासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 6 जणांच्या समितीची बैठक 3 एप्रिल ते 5 एप्रिल या दरम्यान होणार आहे.

पहिले दोन दिवस रेपोदराबाबत सविस्तर चर्चा केली जाणार असून 5 एप्रिलला शुक्रवारी रेपोदरासंदर्भातला निर्णय जाहीर केला जाणार आहे. भारताचा जीडीपी दर हा 8 टक्क्यांच्या आसपास वर्तवला जात असून महागाई 4 टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्याचे आव्हान देशासमोर आहे.

आगामी काळामध्ये जागतिक स्तरावरील मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या अमेरिका आणि इंग्लंड या देशांचे व्याजदरसुद्धा लवकरच घटवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. जागतिक स्तरावर स्वित्झर्लंड हा पहिला देश ठरला आहे ज्यांनी आपल्या व्याजदरामध्ये कपातीची घोषणा केली आहे. याच दरम्यान जपान या देशानेसुद्धा नकारात्मक व्याजदराचा कालावधी आठ वर्षानंतर थांबवला आहे.

फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत काय घडलं

याचदरम्यान अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील बैठकीत व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यादिवशी व दुसऱ्या दिवशी भारतीय शेअरबाजारात तेजीचा माहोल होता. आगामी काळात फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपातीची घोषणा करणार आहे, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.