महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आरबीआयच्या पतधोरण बैठकीत रेपो दर राहणार जैसे थे

06:46 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची द्विमासिक पतधोरण समितीची बैठक 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार असून या बैठकीमध्ये व्याजदर जैसे थे राहण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. व्याजदरात वाढ किंवा कमी करण्यासंदर्भातला निर्णय पतधोरण समितीच्यावतीने गुरुवार 8 ऑगस्ट रोजी घेतला जाणार आहे.

Advertisement

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून सुरु होत आहे. अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याला अनुषंगून रिझर्व्ह बँक या बैठकीमध्ये रेपोदर जैसे तेच ठेवेल असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर सध्याला 6.5 टक्के इतका आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article