महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलग नवव्यांदा रेपोदर 6.5 टक्क्यांवर स्थिर

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ईएमआय वाढणार नाही : आरबीआयच्या पतधोरणाने कर्जधारकांना दिलासा

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

भारतीय रिझर्व्ह बँकेने सलग नवव्यांदा व्याजदरात बदल केलेला नाही. रेपोदर 6.5 टक्क्यांवर कायम ठेवले आहेत. रेपोदर स्थिर पातळीवर राहिल्याने सद्यस्थितीत कर्ज महाग होणार नाही आणि ईएमआयही वाढणार नाही. फेब्रुवारी 2023 मध्ये आरबीआयने शेवटचे दर 0.25 टक्क्यांनी वाढवून ते 6.5 टक्के केले होते.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी दुपारी चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दर दोन महिन्यांनी ही बैठक होते. आरबीआयने जूनमध्ये झालेल्या याआधीच्या बैठकीत व्याजदरात वाढ केली नव्हती. आताही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीने धोरणात्मक दर अपरिवर्तित ठेवण्यासाठी 4-2 बहुमताने मतदान केले. दर स्थिर ठेवण्यासोबतच आरबीआयने आणखीही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार चेक क्लिअरिंगची वेळ कमी करण्यात आली आहे. आता चेक डिपॉझिट केल्यानंतर काही तासांत चेक क्लिअर होतील. यापूर्वी या प्रक्रियेसाठी एक-दोन दिवसांचा अवधी लागत होता. या निर्णयाचा फायदा कोट्यावधी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

महागाई कमी होत आहे, पण प्रगती मंद आणि असमान आहे. भारताची चलनवाढ आणि विकासाची वाटचाल संतुलित पद्धतीने पुढे जात आहे, परंतु महागाई लक्ष्यावर राहील याची खात्री करण्यासाठी जागऊक राहणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन गव्हर्नर दास यांनी केले. आरबीआयने अनधिकृत प्लॅटफॉर्मशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी डिजिटल कर्ज देणाऱ्या अॅप्ससाठी सार्वजनिक भांडार स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. नियमन केलेल्या संस्थांना त्यांच्या डिजिटल कर्ज अॅप्सचा अहवाल आरबीआयला द्यावा लागेल.

युपीआय कर भरणा मर्यादा 1 लाखांवरून 5 लाख ऊपये

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुऊवारी द्वैमासिक चलनविषयक धोरण जाहीर केले. याप्रसंगी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय पेमेंटबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला. केंद्रीय बँकेने युपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा 1 लाख ऊपयांवरून 5 लाख ऊपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article