For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेसाठी सुवर्णमंदिर मंडपाची प्रतिकृती

10:16 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बिजगर्णी महालक्ष्मी यात्रेसाठी सुवर्णमंदिर मंडपाची प्रतिकृती
Advertisement

वार्ताहर /किणये

Advertisement

बिजगर्णी, कावळेवाडी व राकसकोप या तिन्ही गावची महालक्ष्मी देवी यात्रा दि. 16 पासून सुरू होणार आहे. या यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. बिजगर्णी प्राथमिक मराठी शाळेजवळील आवारात यात्रा भरविण्यात येणार आहे. देवीच्या विराजमानासाठी सुवर्ण मंदिर मंडप उभारण्यात येणार आहे. याचे कामकाज जोमाने सुरू आहे. तब्बल तीस वर्षानंतर महालक्ष्मी देवीची यात्रा होणार असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कावळेवाडी, बिजगर्णा, राकसकोप गावांमध्ये सध्या यात्रोत्सवाची तयारी सुरू असून सर्वजण आपापल्या घरांना रंगरंगोटी करीत आहेत. यात्रेच्या आमंत्रण पत्रिकेचे वितरण सुरू आहे. गावातील ही यात्रा नऊ दिवस होणार असून यात्रेसाठी लागणारे कपडे विविध प्रकारचे साहित्य यांची खरेदीही कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप गावातील नागरिक बेळगाव शहरात जाऊन मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. मराठी शाळेसमोरील आवारात यात्रा होणार आहे. या ठिकाणी भव्य असा सुवर्ण मंदिर मंडपाचा शामियाना उभारण्यात येणार आहे. 50 फूट ऊंदी व 90 फूट लांबीचा हा मंडप असून तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. या मंडप डेकोरेशनची पाहणी यात्रा कमिटी अध्यक्ष वसंत अष्टेकर, ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अॅड. नामदेव मोरे, चांगदेव जाधव, श्रीरंग भास्कर, निंगाप्पा मोरे आदींसह यात्रा कमिटी व देवस्थान कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी यात्रा कमिटीचे सर्व सदस्य सकाळपासून रात्री उशिरापर्यंत यात्रोत्सवाच्या कामकाजात मग्न आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.