For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंदनगर, समृद्धीनगर परिसरात चोरीचा पुन्हा प्रयत्न

12:00 PM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
आनंदनगर  समृद्धीनगर परिसरात चोरीचा पुन्हा प्रयत्न
Advertisement

पोलिसांनी रात्रीच्यावेळी गस्त घालण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : आनंदनगर-वडगाव, समृद्धीनगरसह परिसरात महिन्यापूर्वी चोरट्यांनी हैदोस घातला होता. अनेक घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज पळविल्याने भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून चोऱ्या कमी झाल्या होत्या. मात्र पुन्हा सोमवारी रात्री आनंदनगर तिसरा क्रॉस आणि समृद्धीनगर परिसरात काही घरांच्या खिडक्या काढून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडींच्या सत्रामुळे या परिसरात गस्त घालण्यात येत होती. मात्र आता चोऱ्या कमी झाल्याने ती गस्त थांबली. त्यानंतर चोरीचा प्रयत्न झाला आहे. यामुळे पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी होत आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली तरी पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल झाली नाही. या घटनेत कोणताही ऐवज किंवा रोख रक्कम गेली नाही. त्यामुळे संबंधित घर मालकांनी त्याची वाच्यताही करण्याचे टाळले आहे. याबाबत विचारले असता अधिक माहिती दिली नाही. पुन्हा चोरट्यांचा वावर या परिसरात सुरू झाला का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी या परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर त्यामध्ये खंड पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे चोरी झालेल्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यास पोलीस प्रशासन असमर्थ ठरले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.