For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुन्हे वारंवार...लवकरच तडीपार?

06:23 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुन्हे वारंवार   लवकरच तडीपार
Advertisement

तोच तो गुन्हा करणाऱ्यांवर कारवाईची तयारी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा दारू अ•dयांवर पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. खासकरून गोवा बनावटीची व मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणाहून बेळगावात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची तस्करी सुरू झाली आहे. ती रोखण्यासाठी बेकायदा दारूविक्रेत्यांना तडीपार करण्याची तयारी पोलीस दलाने चालवली आहे.

Advertisement

28 मार्च रोजी लक्ष्मी गल्ली, हिंडलगाजवळ राजेश केशव नायक (वय 21) रा. हिंडलगा याला अटक करून कारसह 10 लाख 60 हजार रुपये किमतीचा बेकायदा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या बनावटीची 186.5 लिटर दारू जप्त केली आहे. राजेशवर झालेली ही काही पहिली कारवाई नाही. यापूर्वीही अनेकवेळा बेकायदा दारू वाहतूक व विक्री प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. उपलब्ध माहितीनुसार त्याच्यावर तब्बल 12 हून अधिक गुन्हे नोंद आहेत. एका सीसीबी विभागानेच तब्बल तीनवेळा बेकायदा दारूविक्री प्रकरणी त्याला अटक करून मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर राजेशवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी पोलीस दलाने तयारी सुरू केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या गुन्ह्यातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तोच व्यवसाय करणाऱ्यांची यादी बनवली जात आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या राजेशवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी कागदोपत्रांची पूर्तता करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.