For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोटूर राज्यमार्ग दुरुस्तीचा कमला सुरुवात : ग्रामस्थांतून समाधान

12:50 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोटूर राज्यमार्ग दुरुस्तीचा कमला सुरुवात   ग्रामस्थांतून समाधान
Advertisement

खासदार प्रियांका जारकीहोळींनी घेतली ग्रामस्थांच्या मागणीची दखल

Advertisement

बेळगाव : रस्त्याची चाळण झालेल्या गोटूर राज्यमार्गाच्या दुरुस्तीला मंगळवारपासून सुरुवात झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. गोटूर राज्यमार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ता खचलेला आहे. वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत होती. वाहने रस्त्यावर अडकून पडणे यासारखे प्रकार शिवाय लहानसहान अपघातही घडत होते. रस्त्याच्या दुरस्तीची मागणी ग्रामस्थांनी खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्याकडे केली होती.

काम वेळेत पूर्ण होण्याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे

Advertisement

दरम्यान, खासदार जारकीहेळी यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्याची सूचना केली होती. चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार जारकीहोळी यांनी, गोटूर राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामाला येत्या 3-4 दिवसांत सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काम वेळेत व दर्जेदार होण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना खासदार जारकीहोळी यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना केली आहे.

Advertisement
Tags :

.