For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम

06:51 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम
Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वी जुन्या वीज वाहिन्या व विद्युत खांब हटविण्याचे काम रविवारी करण्यात आले. यामुळे शहराच्या अधिकतर भागात वीजपुरवठा बंद होता. परंतु यामुळे साप्ताहिक सुटी असलेल्या नोकरदारांना मात्र फटका बसला.

हेस्कॉमकडून देण्यात आलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये रविवारी सकाळी वीजपुरवठा बंद करण्यात आला. टिळकवाडी, हिंदवाडी, गोवावेस, काँग्रेस रोड, पाटील गल्ली, टिळकचौक, कॅन्टोन्मेंट हद्द, मारुती गल्ली, शिवाजी कॉलनी, मंडोळी रोड, शहापूर, कपिलेश्वर या परिसरात वीजपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Advertisement

पावसामुळे अनेक वीज वाहिन्यांमध्ये कार्बन तसेच वीज वाहिन्यांची उंची कमी होणे असे प्रकार घडत असतात. गणेशोत्सव काळात विजेच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी पंधरा दिवस पूर्वीच हेस्कॉमकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. साप्ताहिक सुटी असल्याने सरकारीसह खासगी कार्यालयांना सुटी असते. त्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.

पांगुळ गल्ली येथील सिद्धीविनायक मंदिराजवळच्या ट्रान्स्फॉर्मरवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. यामुळे पांगुळ गल्ली, भेंडीबाजार या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. उर्वरित भागामध्ये पुढील आठवड्यात दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याचे हेस्कॉमकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.