For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुरुस्तीचे काम

10:25 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुरुस्तीचे काम
Advertisement

प्रवाशांची गैरसोय, बसला अडथळा

Advertisement

बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवेशद्वारावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने प्रवेशव्दार बॅरिकेडस् लावून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. त्याबरोबर लांबपल्ल्याच्या बसेसना वळसा घालून बसस्थानकात यावे लागत आहे. आधीच प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यातच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने प्रवेशद्वारावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. गतवर्षी मध्यवर्ती बसस्थानकाचे थाटामाटात उद्घाटन झाल्यानंतर अपूर्णावस्थेतील कामांना चालना देण्यात आली. बसस्थानकातील पेव्हर्स, संरक्षक भिंत, शेड उभारणी आणि इतर कामे हाती घेण्यात आली. त्याबरोबर पश्चिमेच्या बाजूला असलेल्या प्रवेशव्दारावरील दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले. त्यामुळे प्रवेशव्दार बॅरिकेडस् लावून बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. शिवाय बसेसना वळसा घालून बसस्थानकात प्रवेश करावा लागत आहे. अर्धवट स्थितीत असलेल्या बसस्थानकाचे गतवर्षी लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे बसस्थानक सुरू झाल्यानंतरही कामे सुरू असल्याचे दिसत आहे. अंतर्गत कामांमुळे बस व्यवस्थेवर परिणाम होवू लागला आहे. अंतर्गत भागात विटा, वाळू आणि इतर साहित्य पडून असल्याने प्रवाशांनाही अडथळा निर्माण होवू लागला आहे. दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.