For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करा

11:59 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांची दुरुस्ती करा
Advertisement

शहापूर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांची हेस्कॉमकडे मागणी

Advertisement

बेळगाव : वडगाव, शहापूर, येळ्ळूर शिवारांतील लेंबकळणाऱ्या वीज वाहिन्यांची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्याप आरआर क्रमांक दिलेला नाही त्यांना तो दिला जावा, अशी मागणी शहापूर, वडगाव, येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांनी हेस्कॉमकडे केली. लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. पावसाळ्यात वीज वाहिन्यांची दुरुस्ती करता येत नसल्याने सध्या हेस्कॉमने वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीसोबत कलंडलेले वीजखांब तातडीने बदलावेत, अशी मागणी करण्यात आली.

मागणी केलेल्या शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन द्या

Advertisement

येळ्ळूर शिवारातील बाळेकुंद्री टीसीमध्ये बिघाड होऊन अनेक दिवस उलटले तरी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे या ठिकाणी नवा ट्रान्स्फॉर्मर बसविला जावा. तसेच हा ट्रान्स्फॉर्मर शेतवडीऐवजी येळ्ळूर रस्त्यानजीक बसविल्यास पावसाळ्याच्या दिवसातही दुरुस्तीचे काम सुलभ होणार असल्याची मागणी करण्यात आली. उन्हाळी शेती ही विजेवर अवलंबून असल्याने ज्या शेतकऱ्यांनी विजेसाठी मागणी केली आहे. त्यांना तातडीने वीज कनेक्शन देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन

हेस्कॉमचे उपविभाग 2 चे साहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश मोहिते यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरच दूर केल्या जातील. तसेच काही कामांसाठी टेंडर काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी शेतकरी राजू मरवे, महादेव कुगजी, बाळू कणबरकर, नागेश यल्लुपाचे, गोटू कानशिडे, प्रकाश डोण्याण्णवर, बाळू जाधव, मधुसुदन पाटील, आनंद दौलतकर, सुधीर कुगजी, परशराम पाटील, प्रकाश बाळेकुंद्री, सदानंद देसाई व इतर शेतकरी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.