For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा

06:27 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा
Advertisement

रमाकांत कोंडुसकर यांचा अल्टीमेट : भव्य मोर्चाचा इशारा

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

शहरासह तालुक्यातील नागरिकांना रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते व इतर विकास कामांची दुर्दशा झाली आहे. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपल्याने येत्या 15 दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास भव्य मोर्चाचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी दिला आहे.

Advertisement

सोमवारी जत्तीमठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शहरातील विविध समस्यांबाबत माहिती दिली. एलअॅण्डटी तसेच गॅस पाईपलाईनसाठी ठिकठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. पावसाळा आणि सणासुदीच्या काळातही रस्ते खणून ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच अपघातही वाढले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर निकृष्ट प्रतीचे रस्ते करण्यात आल्याने ते अवघ्या दोन वर्षात खराब झाल्याचे दिसून येत आहे. रस्ते व इतर कामे करण्यासाठी लागणारा सर्व निधी हा सर्वसामान्यांच्या करातूनच सरकारला मिळत असतो.

ई-आस्थी, पीआयडी, वीज मीटर मिळविण्यासाठी काही जणांकडून वारेमाप पैशांची मागणी केली जात आहे. असे कोणीही पैस मागत असल्यास आमच्याशी संपर्क साधा, असे कोंडुसकर यांनी सांगितले. जिकडे तिकडे भ्रष्टाचार वाढला असून हा वेळीच थांबविणे गरजेचे आहे. सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महिलांसाठी स्वच्छतागृहांची कमतरता आहे. खासबाग व टिळकवाडी साई मंदिर येथील दुकानगाळे पडून आहेत. उद्यानांची देखभाल नसल्याने त्यांचीही दुरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी न झाल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच सहा महिन्यापूर्वी तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील करण्यात आलेले डांबरीकरणाला ठिकठिकाणी खड्डा पडल्याने त्यांनी गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी सागर पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.