For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शास्त्रीनगर येथील ‘त्या’ लोखंडी ब्रिजची दुरुस्ती करा

10:28 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
शास्त्रीनगर येथील ‘त्या’ लोखंडी ब्रिजची दुरुस्ती करा
Advertisement

स्थानिक नागरिकांची मागणी

Advertisement

बेळगाव : शास्त्रीनगर येथील गणेश मंदिराच्या बाजूने गेलेला रस्ता महात्मा फुले रस्त्याला जोडला गेला आहे. या रस्त्यावरील नाल्यावर लहान लोखंडी ब्रिज उभारण्यात आला आहे. या ब्रिजवरुन वाहने ये-जा करतात. तसेच नागरिकांचीही वर्दळ असते. मात्र आता तो लोखंडी ब्रिज अत्यंत खराब झाला आहे. कधी कोसळेल याची शाश्वती नाही. तेव्हा तातडीने त्या ब्रिजची नव्याने बांधणी करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. सदर नाल्याची स्वच्छता ही महत्त्वाची आहे. सध्या या नाल्यामध्ये गाळ साचला असून, या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तेव्हा तातडीने हा नाला साफ करावा. याचबरोबर त्या ब्रिजची बांधणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये या नाल्याच्या सफाईसाठी निधी मंजूर केल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप तरी कोणतीच साफसफाई केली नाही.

नाल्याची तातडीने सफाई करा

Advertisement

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी सफाई केल्याचे दाखविले जाते. मात्र त्यानंतर त्या नाल्याकडे फिरकुनही बघितले जात नाही. नाल्याजवळच घरे असल्यामुळे त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर घरांना तडेही गेले आहेत. तेव्हा तातडीने याची सफाई करावी, याचबरोबर नव्याने ब्रिज उभारावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.