For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा

06:50 AM Aug 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सवापूर्वी ग्रामीण रस्ते दुरुस्त करा
Advertisement

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून काही मार्गांवरून वाहतूक करणेही धोकादायक बनले आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले.

Advertisement

पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची अद्याप प्रभावीपणे डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे शहराला जोडणाऱ्या ग्रामीण मार्गांवरून प्रवास करताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही मार्गांची अवस्था इतकी खराब झाली आहे की, केएसआरटीसीच्या बससेवाही प्रभावित झाल्या आहेत. बसफेऱ्या कमी होणे अथवा काही मार्गांवर बस चालविण्यास अडचणी निर्माण झाल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी रस्त्यांची दुऊस्ती अत्यावश्यक आहे. मात्र पावसामुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था लक्षात घेऊनही संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. ख•s बुजविण्याबरोबरच वारंवार खराब होणाऱ्या मार्गावर दर्जेदार व पक्के रस्ते निर्माण करण्याची मागणी होत आहे.

येत्या काही दिवसांत तालुक्मयातील विविध गावांमध्ये सार्वजनिक गणपती मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. उत्सवाच्या काळात गावांमध्ये नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढते. त्यामुळे सध्याच्या खराब रस्त्यांमुळे वाहतुकीची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुऊस्ती करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

अनामत रक्कम न घेता तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून द्या

बेळगाव शहरात गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीजजोडणी देताना अनामत रकमेची मागणी केली जात नाही. त्याचधर्तीवर तालुक्यातील ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळांनाही कोणतीही अनामत रक्कम न घेता तात्पुरती वीजजोडणी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणीचे निवदेन हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना सादर करण्यात आले.

यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.