For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पिरनवाडी मुख्य रस्ता दुरुस्त करा

10:26 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पिरनवाडी मुख्य रस्ता दुरुस्त करा
Advertisement

वर्दळ अधिक असल्याने रस्ता झाला खड्डेमय

Advertisement

किणये : बेळगाव चोर्ला रोडवरील पिरनवाडी मुख्य रस्त्यावर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिकांतून होत आहेत. या रस्त्यावरील वर्दळ पाहता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून रस्त्यावरील खड्ड्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी होत आहे. पिरनवाडी पाटील गल्लीच्या कॉर्नरवरील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. वाहनधारक खड्डे चुकविण्यासाठी अन्य बाजूने वाहने चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे पाठीमागून येणाऱ्या आणि दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या वाहनांना थांबावे लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. बऱ्याचवेळा वाहतुकीसाठी अडथळे निर्माण होऊ लागले आहेत.

रस्त्यावर वर्दळ, तरीही दुरुस्तीकडे दुर्लक्ष

Advertisement

गोव्याला ये-जा करणारी वाहने पिरनवाडी या मुख्य रस्त्यांवरूनच चोर्लामार्गे जातात. पिरनवाडीच्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक गावातील वाहनधारक या मार्गावरूनच बेळगावला ये-जा करतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तरीही रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का झाले आहे? असा सवाल पिरनवाडीतील नागरिक उपस्थित करू लागले आहेत. वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावरून खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पिरनवाडीसह वाहनधारकांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.