For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सदाशिवनगर येथील ‘त्या’ उद्यानाच्या दुरुस्तीला सुरुवात

10:35 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सदाशिवनगर येथील ‘त्या’ उद्यानाच्या दुरुस्तीला सुरुवात
Advertisement

बेळगाव : सदाशिवनगर येथील उद्यानाच्या दुरुस्तीला सुरूवात केली आहे. संरक्षक भिंत तसेच आतील वॉकर्स वे देखील तयार करण्यात येत आहेत. त्याचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र त्या उद्यानातील फुलझाडेही खराब झाली आहेत. तेव्हा पुन्हा नव्याने फुलझाडे लावावीत, अशी मागणी होत आहे. मनपाने उद्यानांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. सदाशिवनगर येथील त्या उद्यानाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या परिसरातच मनपा आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शासकीय बंगले आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्या उद्यानातील लहान मुलांसाठी ठेवलेले पाळणे तसेच इतर साहित्य खराब झाले होते. त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत होती. आता बांधकामाला सुरूवात झाली आहे. उद्यानातील मुलांना खेळण्याचे साहित्यही उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.