For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मच्छे-वाघवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

10:13 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
मच्छे वाघवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
Advertisement

युवा समितीच्या प्रयत्नांना यश : रस्त्याची होणार तात्पुरती दुरुस्ती

Advertisement

वार्ताहर /किणये

मच्छे-वाघवडे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक अक्षरश: वैतागून गेले होते. या खड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटनाही घडलेल्या होत्या. या रस्त्याच्या दुऊस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. या रस्त्याच्या दुऊस्तीसाठी तसेच डांबरीकरणासाठी म. ए. युवा समितीच्यावतीने आवाज उठविण्यात आला. अखेर युवा समितीच्या प्रयत्नांना यश आले असून रस्त्याच्या दुऊस्तीचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. मच्छे-वाघवडे दुर्लक्षित रस्त्यासाठी परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी आवाज उठवूनसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुऊस्ती संदर्भात दुर्लक्ष केले होते. म. ए. युवा समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी यांनी युवा समितीच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना देत मच्छे -वाघवडे दुऊस्ती संदर्भात आवश्यक पावले उचलावीत, अशी सूचना करण्यात आली होती. त्यांनतर बेळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मच्छे-वाघवडे दुऊस्ती संदर्भात मागील आठवड्यात म. ए. युवा समितीच्या शिष्टमंडळासमवेत रस्त्याची पाहणी करून रस्ता वाहतुकीस प्रतिकूल असल्याने रस्त्याची नव्याने पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पण निवडणूक आचारसंहिता आणि पावसाळा जवळ येऊन ठेपल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची तातडीने तात्पुरती दुऊस्ती करून आणि नव्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे 8 कोटींचा प्रस्ताव पाठविले असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने म. ए. युवा समितीला दिले आहे. वाघवडे-मच्छे रस्त्याच्या बाजूला औद्योगिक वसाहत आहे. स्थानिक नागरिकांसह कामगार वर्गाची मोठी वर्दळ या रस्त्यावरून होत असते. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे होते. म. ए. युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे आणि पुढाकारातून रस्त्याची दुऊस्ती होत असल्यामुळे वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.