कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरटीओ सर्कलनजीक फुटलेल्या गॅस पाईपलाईनची दुरुस्ती

06:32 AM Sep 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

शहरवासियांना 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी एलअॅण्डटी कंपनीकडून पाईपलाईन घालण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान आरटीओ ऑफीसनजीक पाईपलाईन घालण्याच्यादृष्टीने खोदकाम करण्यात येत होते. मात्र यावेळी गॅस पाईपलाईन फुटल्याने समस्या निर्माण झाली. मेगा गॅस कंपनीकडून त्वरित गॅसलाईनची दुरुस्ती करून नेहमीप्रमाणे कार्यान्वित करण्यात आली. मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने याचा नागरिकांना फटका बसल्याचेही दिसून आले.

Advertisement

शहर व उपनगरात शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने महापालिकेकडून काम हाती घेण्यात आले आहे. याचे टेंडर एलअॅण्डटी कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीकडून शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी खोदकाम करून पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे. मात्र हे करत असताना   नजरचुकीने इतर समस्याही उद्भवत आहेत. यासाठी कंपनीने योग्यरित्या व नागरिकांना त्रास होऊ नये अशा प्रकारची कामे करण्याची मागणी होत आहे.

आरटीओ ऑफीसनजीक शिवाजीनगर परिसराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. यावेळी नजरचुकीने भुतरामहट्टी, उद्यमबाग, तसेच काही शहर भागाला गॅसपुरवठा करणारी गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे समस्या निर्माण झाल्याने तात्काळ याची माहिती देखभाल करणाऱ्या मेगा गॅस कंपनीला देण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन गॅस पाईपलाईन दुरुस्ती करून नेहमीप्रमाणे पूर्ववत केली. खोदकाम केल्यामुळे याचा ये-जा करणाऱ्या नागरिकांवर परिणाम होऊन काहीवेळा वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागल्याचे निदर्शनास आले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article