महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रभाग क्रमांक 10 मधील ‘त्या’ कूपनलिकेची दुरुस्ती

11:15 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : प्रभाग क्रमांक 10 मधील ज्युनिअर शिवाजी पार्क येथील कूपनलिका खराब झाली होती. त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांनी केली होती. त्यानंतर एलअँडटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ‘त्या’ कूपनलिकेची दुरुस्ती केली आहे. यामुळे जनतेतून समाधान होत आहे. सदर कूपनलिका जुनी असली तरी ‘त्या’ कूपनलिकेला मुबलक प्रमाणात पाणी होते. मात्र त्यामधील पाईप व विद्युत मोटार खराब झाल्यामुळे समस्या निर्माण झाली होती. त्याची केवळ दुरुस्ती नको तर नव्यानेच पाईप घाला आणि मोटारही नवीनच बसवा, अशी मागणी भातकांडे यांनी केली. त्यानुसार त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. यावेळी रेखा पवार, संगीता तांबे, तनुजा पाटील, मनीषा सरोळकर, सावित्री कदम, एलअँडटी कंपनीचे अधिकारी चंद्रबोस रविचंद्रन, निलेश मोहिते यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article