कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी नगरपरिषदेचे पर्यटक स्वागत केंद्र पुन्हा सुरू करा

03:08 PM Apr 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

माजी नगरसेवक राजु बेग यांचे मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांना निवेदन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी शहरातील जन. जगन्नाथराव भोसले स्मृति शिवउ‌द्यानालगत असलेले नगरपरिषदेचे पर्यटक स्वागत केंद्र (टि.आर.सी.) गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. यामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याची गंभीर दखल घेत माजी नगरसेवक राजु बेग यांनी तातडीने या केंद्राची नव्याने निविदा काढून ते पुन्हा सुरू करण्याची मागणी  नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी  पाटील यांच्याकडे केली आहे. बेग यांनी निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते आणि पर्यटक स्वागत केंद्र पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र बंद असल्याने पर्यटकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि शहराच्या प्रतिमेवरही नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून हे केंद्र पुन्हा सुरू करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान टळेल आणि पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # sawantwadi
Next Article