रेणुका सिंग ठाकुरला हिमाचलकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर
वृत्तसंस्था / सिमला
2025 च्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकुरला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुखू यांनी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
रेणुका सिंग ही हिमाचल प्रदेशमधील सिमला जिल्ह्यातील रोहेरु येथील रहिवासी असून तिची या स्पर्धेतील कामगिरी मोलाची ठरली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला असून हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखू यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरचे खास अभिनंदन केले आहे. रेणुका सिंगने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात दर्जेदार गोलंदाजी करत द. आफ्रिकेच्या फलंदाजांवर चांगलेच दडपण आणले होते. रेणुका सिंगच्या कामगिरीचा आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो तसेच रेणुका सिंगला शासकीय नोकरी देण्याचे अभिवचन हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.