For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात रेणुकामाता दर्शन रथयात्रेला प्रारंभ

02:53 PM Dec 21, 2024 IST | Pooja Marathe
शहरात रेणुकामाता दर्शन रथयात्रेला प्रारंभ
Renuka Mata Darshan Rath Yatra begins in the city
Advertisement

धर्मजागरण ट्रस्ट व सकल हिंदू समाजातर्फे आयोजन
दिवसभरात लक्षतिर्थ वसाहत, वारे वसाहत, राजारामपुरी, कनाननगरसह विविध भागांमधून रथ दाखल
अनेक भाविकांकडून देवीला साडी अर्पण
कोल्हापूर
आगामी 10 दिवसांच्या कालावधीत 52 गावांमधील लोकांना दर्शन घडण्याच्या भावनेने धर्मजागरण ट्रस्ट व सकल हिंदू समाज आयोजित रेणुकामाता दर्शन रथयात्रेला शुक्रवारी सुऊवात करण्यात आली. अंबाबाई मंदिर येथून रथयात्रेने नगरप्रदक्षिणेसाठी प्रस्थान केले. कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी, भाळवण मठाचे (सांगली) दादा महाराज व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) जिल्हा संघचालक सूर्यकिरण वाघ यांच्या हस्ते रथयात्रेचे पुजून कऊन रेणुकादेवीची आरती करण्यात आली. यानंतर उदं ग आई उदं आणि रेणुकादेवीच्या नावानं चांगभलं असा गजर करत रथाने लक्षतिर्थ वसाहतीकडे प्रयाण केले. रथासोबत धर्मजागरण ट्रस्ट व सकल हिंदू समाजाचे पन्नासहून अधिक कार्यकर्ते आहेत.
दरम्यान, करा स्वागताची भव्य तयारी...डोंगराची यल्लमा येणार आपल्या दारी असे घोषवाक्य घेऊन रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. रथयात्रा सुऊ करण्यापूर्वी सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवी देवस्थानकडून देण्यात आलेल्या रेणूकादेवीच्या टाकासह रेणुकामातेची वस्त्रs, पादूका व डोंगरावरील परशुराम कुंडातील जल असलेला मंगल कलश ठेवलेला रथ यल्लमाच्या ओढ्यावरील रेणुका मंदिराजवळ नेण्यात आला. येथे पुजाऱ्यांकडून पूजन झाल्यानंतर रथाला अंबाबाई मंदिराजवळ आणले. यानंतर काडसिद्धेश्वर स्वामींनी रथाचे पुजन कऊन मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या सौंदत्ती यात्रेसाठी रेणुकादेवीच्या दारी अनेकांना जाता आले नाही. परंतू आता रेणुकादेवीच भाविकांच्या दारी आली आहे. धर्मजागरण ट्रस्ट व सकल हिंदू समाजाने पुढाकार घेऊन भाविकांना देवीचे दर्शन घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे. तेव्हा आता भाविकांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढे यावे, असे आवाहन काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. यावेळी रथयात्रा प्रमुख चंद्रकांत शिंदे, यात्रा संयोजक बापू महाराज, यात्रा सहप्रमुख संतोष पाटील, रवी मिसाळ, सनथकुमार दायमा आदी उपस्थित होते.
दरम्यान, दुपारी लक्षतिर्थ वसाहतमधील भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर रथाला वारे वसाहत, राजारामपुरी, कनाननगर, सदर बाजार, रमणमळा या भागांमध्ये विविध मार्गावऊन नेण्यात आले. या सर्व भागांमधील अनेक भाविकांनी औक्षण करत रथातील रेणुकादेवीला साडीसह नैवेद्य अर्पण केला. सायंकाळी बावड्यात रथाने प्रवेश केला. येथील भाविकांनी रेणुकादेवीला साडी व नैवेद्य अर्पण केल्यानंतर बावड्यात रथ व सोबतच्या कार्यकर्त्यांनी रात्रीची वस्ती केली. शनिवार 21 रोजी सकाळी रथ कसबा सांगावकडे प्रयाण केले. तसेच 22 रोजी सांगवडे, 23 रोजी आसुर्ले या गावी रथ प्रस्थान करेल. तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये रथाला नेण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.