ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघात रेन्शॉ, ग्रीनचा समावेश
वृत्तसंस्था, ब्रिस्बेन
बलाढ्या ऑस्ट्रेलियन संघाला द. आफ्रिकेत कसोटी मालिका गमवावी लागली होती. आता या नंतर मायदेशात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सोमवारी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली. रेन्शॉ आणि ग्रीन यांचा संघात समावेश करण्यात आला असून वेगवान गोलंदाज स्टार्क, हॅजलवूड तसेच नियमीत कर्णधार कमिन्सला विश्रांती देण्यात आली आहे.
या आगामी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे राहील. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची ही वनडे मालिका 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 13, दुसरा सामना 15 आणि तिसरा सामना 18 नोव्हेंबरला होईल. 14 सदस्यांच्या ऑस्ट्रेलियन संघामध्ये ग्रीन, रेन्शॉसह अॅलेक्स कॅरे, इंग्लीस, हेड, कोनोली यांचा समावेश आहे. या वनडे मालिकेनंतर उभय संघामध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी मिचेल मार्शकडे कप्तानपदाची जबाबदारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोपविली आहे.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ : मिचेल मार्श (कर्णधार), बार्टलेट, बर्डमन, कॅरे, कोनोली, एडवर्ड्स, ग्रीन, हेड, इंग्लीस, जॉनसन, पिक, रेन्शॉ, स्कॉट, झाम्पा
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ : मिचेल मार्श (कर्णधार), बार्टलेट, बर्डमन, निखिल चौधरी, टीम डेव्हीड, डेव्हीस, एडवर्ड्स, इलिस, मॅकगर्क, हार्पर, जॉनसन, ओवेन, शॉ, आणि झाम्पा.
