सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. सारामा आल्मेडा यांचे निधन
प्रतिनिधी | सिंधुदुर्ग
'फ्लोरा ऑफ सावंतवाडी' या ग्रंथाच्या निर्मात्या, बीएनएचएसच्या आजीव सभासदा आणि सुप्रसिद्ध सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. श्रीम.सारामा आल्मेडा यांचे नुकतेच मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. सुप्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ कै. डॉ. मार्सेलीन आल्मेडा यांच्या त्या पत्नी होत. भारतीय वनस्पती वर्गीकरण शास्त्र संघटनेचे अतिशय प्रतिष्ठेचे म्हणून ओळखले जाणारे 'फादर . एच. संतापाऊ सुवर्णपदक त्यांना प्राप्त झाले होते. कै.सारामा या सावंतवाडीच्या रहिवासी होत्या. सिंधुदुर्गातील वनस्पतींच्या संशोधनात त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा मुली ,सून ,नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वनस्पती शास्त्र संशोधन क्षेत्रातील एक फार मोठा तारा निखळला अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.