रेनॉची सुधारित डस्टर लवकरच होणार लाँच
06:19 AM Mar 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली :
Advertisement
फ्रान्समधील कार निर्माती कंपनी रेनॉ भारतीय बाजारामध्ये आपल्या नव्या मॉडेल्स सादर करीत आली आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनी आपली नवी डस्टरची सुधारित आवृत्ती भारतीय बाजारात लाँच करण्याची तयारी करीत आहे. रेनॉची सुधारित डस्टर ही कार 17 मार्च रोजी भारतीय रस्त्यावर उतरेल.
कोणत्या असणार सुविधा
Advertisement
स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल गटामध्ये सादर होणाऱ्या या कारमध्ये विविध नव्या वैशिष्ट्यांचा समावेश असणार आहे. नवी रेनॉ डस्टर जागतिक मॉडेलप्रमाणे दिसते. समोरच्या बाजूला एलईडी डीआरएल देण्यात आले असून सिल्व्हर अॅक्सेंट रुपी बंपर, पिक्सल स्टाईल फॉग लॅम्प देण्यात आला आहे. आधीच्या तुलनेमध्ये ही गाडी अधिक प्रिमियम बनविण्यात आली आहे. गाडी खरेदी करणाऱ्यांना आगाऊ बुकिंग करिता 21 हजार रुपये भरावे लागणार आहेत.
Advertisement