For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेनॉची नवी ट्राइबर, टर्बो बाजारात लाँच

06:28 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
रेनॉची नवी ट्राइबर  टर्बो बाजारात लाँच
Advertisement

किंमत 10 लाखाच्या आत : 21 किमीचे मिळणार मायलेज

Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

आपण सध्याला 7 सीटरची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी रेनॉने आपली ट्राइबर ही नवी कार बाजारात लाँच केली आहे. सामान्य ट्राइबरसह ट्राइबरचे टर्बो मॉडेल बाजारात उतरवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने या गाडीची किमत 10 लाखाच्या आत ठेवली आहे.

Advertisement

विविध मॉडेल, किमती

रेनॉने ट्राइबर टर्बो 1.0 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलेले आहे. टर्बोची किंमत पाहता 7.84 लाख रुपये इतकी असणार असल्याचे समजते. नवी ट्राइबर टीसीइ 100 ला दोन प्रकारात लाँच केले आहे. इव्होल्युशन प्रकारच्या मॉडेलच्या कारची सुरुवातीची किंमत 7.84 लाख रुपये आहे तर टॉप स्पेक इमोशन मॉडेलची किंमत 8.99 लाख रुपये इतकी असणार आहे. तर सामान्य ट्राइबर गाडीची सुरुवातीची किंमत 5.80 लाख रुपये इतकी आहे. टर्बो इंजिनसह येणाऱ्या नव्या गाडीची किमत मात्र जुन्याच्या तुलनेत 2 लाख रुपये अधिक आहे.

इंजिन, मायलेज

ट्राइबर टर्बो 1.0 लिटर, 3 सिलेंडर टीसीई टर्बो-पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. यासोबत 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स आहे. सामान्य ट्राइबरमध्ये 1.0 लिटर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल. ट्राइबर टर्बो ही 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग 10.8 सेकंदात घेऊ शकते. किगर व डस्टर यांना वापरलेले टर्बो इंजिन नव्या गाडीत असेल. टर्बो ही नवी गाडी प्रति लिटर 21 किलोमीटर इतके मायलेज देते. पेट्रोल आधारीत सामान्य ट्राइबरचे मायलेज हे 19 किलोमीटर प्रति लिटर इतके आहे.

Advertisement
Tags :

.