For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

रेनॉची न्यू डस्टर एसयूव्ही याच महिन्यात येणार?

06:48 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
रेनॉची न्यू डस्टर एसयूव्ही याच महिन्यात येणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चारचाकी वाहन निर्माती कंपनी रेनॉने याच महिन्यामध्ये आपली नवी एसयूव्ही गटातील न्यू डस्टर कार लॉन्च करण्याची योजना आखली आहे. सदरच्या नव्या गाडीचे लॉन्चिंग 29 नोव्हेंबरला केले जाणार असल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयूव्ही गटात मोडणारी ही कार अनेक बदलांसह बाजारात येणार असल्याचे बोलले जात आहे. मागच्या मॉडेल प्रमाणेच साधारणशी मिळतीजुळती अशी ही नवी कार असणार असून या नव्या कारमध्ये  हॉरीझाँटल एलईडी हेडलाईटची रचना असणार आहे. याशिवाय रेडिएटर ग्रील आणि मागच्या बाजूला बंपरच्या रचनेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याशिवाय अंतर्गत भागातही हवाहवासा बदल करण्यात आला आहे.

काय आहेत सुविधा

Advertisement

नव्या डॅशबोर्डसह 8 इंचाच्या टच क्रीनसह इन्फोटेनमेंट सिस्टीम यात असणार असून वायरलेस चार्जर, वायरलेस नेटवर्किंग, पॅनोरमिक सनरुफ, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखी वैशिष्ट्योही यामध्ये देण्यात आली आहेत. पेट्रोल आणि हायब्रीड इंजिनचा पर्याय या गाडीमध्ये देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.