For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थितीतील झाडे हटवा

10:58 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्यापूर्वी धोकादायक स्थितीतील झाडे हटवा
Advertisement

भाग्यनगर येथील रहिवाशांची मागणी

Advertisement

बेळगाव : नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाग्यनगर परिसरात झाड कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. या परिसरात आणखीनही काही धोकादायक झाडे आहेत. ती झाडे पडून नुकसान होण्याची शक्यता आहे. तेंव्हा मनपा व वनविभागाने संयुक्तपणे सर्व्हे करून ती झाडे हटवावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. वळीव पावसामध्ये दरवर्षीच झाडे कोसळून वाहनांचे नुकसान होत आहे. तर अनेक जण जखमीही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही जणांचे जीवही गेले आहेत. तेंव्हा पावसाळ्यापूर्वी जी धोकादायक झाडे आहेत ती हटविणे गरजेचे आहे.  भाग्यनगर रस्त्यावर अनेक धोकादायक झाडे आहेत. ती झाडे कधी पडतील, याची शाश्वती नाही. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेवून झाडे हटवावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.