भाग्यनगर येथील शेड दोन दिवसात हटवा
09:34 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मनपा आयुक्त कार्तिक एम. यांना निवेदन
Advertisement
बेळगाव : भाग्यनगर पाचवा क्रॉस येथील वृंदावन कॉलनीमधील मैदानावर उभारण्यात येत असलेल्या शेडला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे. यामुळे या पार्श्वभूमीवर गुरुवारी रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त कार्तिक एम. यांची भेट घेऊन संबंधित शेड दोन दिवसात हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. सरकारी शुल्क भरून विकसित केलेला खासगी लेआऊट असल्याने मैदानाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, अशी नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून तातडीने सदर शेड हटविण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सदर शेडवरून दिवसेंदिवस वातावरण तापत चालले असल्याने याकडे महानगरपालिकेने लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.
Advertisement
Advertisement