For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात

01:06 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात
Advertisement

महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून शहर परिसरात कारवाई

Advertisement

बेळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून शहरातील जाहिरात फलक हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी पथकाकडून शहर व परिसरातील जाहिरात फलक हटविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील जाहिरात फलकांचा प्रश्न सातत्याने महापालिकेच्या बैठकांमध्ये चर्चेत येत आहे. त्यामुळे याची दखल घेत अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहर व परिसरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा प्रश्न वारंवार महानगरपालिकेत चर्चेला येत आहे. कँटीलिव्हर आणि गँड्रीजचा ताबा महानगरपालिकेकडून घेण्यात आला असला तरी त्यावर जिकडेतिकडे अनधिकृतरित्या जाहिरात फलक लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर विद्युतखांब, पथदीप, झाडे, दुभाजक यासह जागा मिळेल त्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे अनधिकृत जाहिरात फलकांनी शहर परिसर झाकोळला आहे. ही बाब लक्षात घेत बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाकडून फलक हटविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.