भाग्यनगरमधील धोकादायक झाडे हटविण्यास सुरुवात
11:02 AM Jun 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगाव भाग्यनगर सातवा क्रॉस परिसरातील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी तीन महिन्यांपासून प्रलंबित होती. मात्र ‘तरुण भारत’ने सातत्याने या समस्येचा पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आल्याने रविवारपासून या परिसरातील धोकादायक झाडे हटविण्याला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे निवेदने दिली होती. याअगोदर येथील काही झाडांच्या फांद्या परिसरात पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कोसळून नुकसान झाले होते. ‘तरुण भारत’ने सातत्याने आवाज उठवल्यामुळे अखेर संबंधित विभागांनी कारवाईला सुरुवात केली आहे. या सकारात्मक प्रतिसादामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘तरुण भारत’ला धन्यवाद दिले आहेत.
Advertisement
Advertisement