For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बॉक्सिंग दिग्गज जॉर्ज फोरमन यांच्या स्मृतींना उजाळा

06:42 AM Apr 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
बॉक्सिंग दिग्गज जॉर्ज फोरमन यांच्या स्मृतींना उजाळा
Advertisement

वृत्तसंस्था/ ह्युस्टन

Advertisement

दिग्गज बॉक्सर जॉर्ज फोरमन यांना सोमवारी त्यांच्या मूळ गावी ह्युस्टन येथे श्रद्धांजली वाहताना त्यांच्या महान बॉक्सिंग कारकिर्दीबरोबरच त्यांची देवाची भक्ती, कुटुंब, घोडे आणि चीजबर्गरवरील प्रेम तसेच सहकाऱ्यांना मदत करण्याची इच्छा यांच्या आठवणी जागविण्यात आल्या. फोरमन यांचे 21 मार्च रोजी वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या मृत्यूचे कारण उघड केलेले नाही.

‘ते नेहमीच प्रेमळ राहण्याचा उपदेश करत असत. जीवन शेवटी हेच आहे. जॉर्ज यांची भावना शुद्ध होती, कारण ते जे उपदेश करत असत त्याप्रमाणे ते वागतही असत आणि त्यावर विश्वास ठेवत असत, असे ह्युस्टनमधील टेक्सास सदर्न विद्यापीठाचे माजी अध्यक्ष व जॉर्ज यांचे जुने मित्र जेम्स डग्लस म्हणाले. जवळजवळ दीड तासाच्या श्रद्धांजलीदरम्यान फोरमन यांच्या कुटुंबाने आणि मित्रांनी एका अशा माणसाच्या किश्श्यांचे स्मरण केले, जे दोन वेळा बॉक्सिंग हेविवेट चॅम्पियन राहिले. शिवाय ते ईशान्य ह्युस्टनमधील चर्चमध्ये जीवनावर प्रवचने देणारे धर्मगुरू आणि जॉर्ज फोरमन ग्रिलसाठी प्रसिद्ध असलेले एक जाणकार व्यापारीही होते.

Advertisement

वर्थम थिएटर सेंटर येथे ही शोकसभा झाली. यावेळी त्यांचा पूर्वी मुद्रित केलेला संदेश ऐकविण्यात आला. ‘जिंकणे आणि हरणे कधीही कायमचे हास्य निर्माण करू शकत नाही. पण दररोज आपण पाहणाऱ्या चेहऱ्याला मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले, असे सांगितल्याने ते साध्य करणे शक्य आहे’, असे फोरमन त्या संदेशात म्हणाले. माजी बॉक्सर मायकेल मूरर, ज्यांना 1994 मध्ये पराभूत करून 45 व्या वर्षी हेविवेट चॅम्पियनशिप जिंकणारे फोरमन सर्वांत वयस्कर पुऊष बॉक्सर बनले, त्यांनी सांगितले की, त्यांच्यात पुढे आदरावर आधारित मित्रसंबंध निर्माण झाले आणि ते 30 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिले. जॉर्ज आयुष्यात एक चॅम्पियन होत.

फोरमन यांनी 1968 मध्ये ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते म्हणून त्याच्या बॉक्सिंग कारकिर्दीची सुऊवात केली आणि पुढच्या वर्षी ते व्यावसायिक बॉक्सर बनले. 1973 मध्ये ज्यो फ्रेझियरला हरवून ते सर्वप्रथम हेविवेट चॅम्पियन बनले.

Advertisement
Tags :

.