दोघांचे चेहरे लक्षात ठेवा!
शाळेवरील हल्ल्यासाठी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना ठरविले जबाबदार : इराणकडून छायाचित्रे जारी
मिनाबच्या ‘शजरे तैयर्ब’ गर्ल्स स्कूलवरील हल्ल्यासाठी इराणने अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविले आहे. भारतातील इराणच्या दूतावासाने एक्सवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. अमेरिकेच्या नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांची छायाचित्रे जारी करण्यात आली आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांचा गुन्हा लक्षात ठेवावा. कमांडर ली आर. टेट आणि कार्यकारी अधिकारी जेफ्री ई यॉर्क यांनी तीनवेळा टॉमहॉक क्षेपणास्त्रs डागण्याचा आदेश दिला होता, ज्यामुळे मिनाबच्या एका शाळेतील 168 निष्पाप मुलींना जीव गमवावा लागला असा आरोप इराणने केला आहे.
ट्रिपल टॅप स्ट्राइक
या हल्ल्याची सर्वात भयावह बाब म्हणजे यात ‘ट्रिपल टॅप’चा वापर करण्यात आला होता. पहिले क्षेपणास्त्र कोसळल्यावर चित्कार सुरू झाला आणि स्थानिक लोक आणि बचाव पथक ढिगाऱ्यांमधून मुलींना बाहेर काढण्यासाठी धावले असताना दुसरे आणि मग तिसरे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. या रणनीतिचा उद्देश केवळ विध्वंस घडविणे नव्हे तर मदतीसाठी पोहोचणाऱ्या लोकांनाही संपविणे असतो.
यूएसस स्प्रुनान्सचे कमांडर
इराणने या हल्ल्याकरता थेट अमेरिकेच्या नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कमांडिर ऑफिसर म्हणून लेह आर. टेट यांनी टॉमहॉक क्षेपणास्त्रs डागण्याचा आदेश दिला होता. तर कार्यकारी अधिकारी जेफ्री ई यॉर्क यांनी या पूर्ण घातक अभियानाची योजना आखली होती असा दावा करत इराणने या दोन्ही अधिकाऱ्यांना ‘युद्ध गुन्हेगार’ संबोधिले आहे.
अमेरिकेचे स्पष्टीकरण
लक्ष्य निश्चितीत चूक झाली आहे. जुन्या गुप्तचर माहितीच्या आधारावर हा शालेय परिसर प्रत्यक्षात इराणच्या सैन्याचा काका तळ असल्याचे वाटले असे स्पष्टीकरण अमेरिकेच्या सैन्याने दिले आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पूर्ण प्रकरणच फेटाळले आहे.