For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करणीबाधेचा उतारा...मुका जीव बिचारा

12:34 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
करणीबाधेचा उतारा   मुका जीव बिचारा
Advertisement

म्हशीच्या पोटात लोखंडी खिळे, पत्र्याचे तुकडे : करणीबाधा न करण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : करणीबाधा करून ठेवण्यात आलेले साहित्य खाल्ल्याने म्हशीच्या जीवावर बेतले आहे. खाद्यपदार्थांसोबत लोखंडी खिळे, पत्र्याचे तुकडे व वायसर असे साहित्य म्हशीच्या पोटामध्ये गेले होते. त्या म्हशीचे तात्काळ ऑपरेशन करून हे सर्व लोखंडी साहित्य बाहेर काढण्यात आल्याने तिचा जीव वाचला. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या करणीबाधेचे प्रकार करू नयेत, असे आवाहन पशुपालकांकडून करण्यात आले आहे. कंग्राळी खुर्द येथील सौदागर कॉलनी परिसरात हा प्रकार घडला आहे. दुभत्या म्हशीला वारंवार आजार जडत असल्याने पशुवैद्याकडून तपासणी करण्यात आली. यावेळी तिच्या पोटामध्ये लोखंडी साहित्य असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यामुळे तातडीने त्या म्हशीचे ऑपरेशन करण्यात आले. ऑपरेशननंतर म्हशीच्या पोटामध्ये लोखंडी साहित्य तसेच प्लास्टिकचा काही भाग दिसून आला. काही दिवसांपूर्वी रस्त्यावरून जाताना करणीबाधा करून ठेवण्यात आलेले साहित्य खाल्ले होते. या करणीबाधेच्या सामानामध्ये लोखंडी साहित्य घालण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारे कोणीही करणीबाधेचे प्रकार करू नयेत, मुक्या जनावरांचे जीव धोक्यात येत असल्याचे आवाहन पशुपालकांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.