For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2 कंपन्यांच्या समभागांमध्ये कमालीची तेजी

06:22 AM Jul 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
2 कंपन्यांच्या समभागांमध्ये कमालीची तेजी
Advertisement

 मुंबई :

Advertisement

शेअरबाजारात सोमवारी 2 कंपन्यांचे समभाग जोरदार दौडताना दिसून आले. यामध्ये एजीस वोपाक टर्मिनल्स लिमिटेड व एजीस लॉजिस्टीक्स लिमिटेड यांचा समावेश होता. एजीस वोपाकचा समभाग सोमवार 8 टक्के इतका वाढत 284 रुपयांच्या भावावर इंट्रा डे दरम्यान व्यवहार करत होता. दुसरीकडे एजिस लॉजिस्टीक्सचा समभाग 9 टक्के वाढत इंट्रा डे दरम्यान 1423 रुपयांवर पोहचला होता. एजिस लॉजिस्टीक्सच्या समभागात मागच्या 1 महिन्यात 81 टक्के इतकी वाढ झाली आहे. वर्षभरात समभागाने 95 टक्के इतका गुंतवणूक परतावा दिला आहे. एजिस वोपाकचा समभाग 1 महिन्यात 47 टक्के तेजीत होता. गेल्या वर्षभरात या समभागाने 16 टक्के इतकी तेजी राखली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.