For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरोग्यसेवेत सावंतवाडी रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी

आरोग्यसेवेत सावंतवाडी रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेतील रुग्णालयांच्या मूल्यांकनामध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाने कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांक, तर कुडाळ येथील महिला व बालकल्याण रुग्णालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे सावंतवाडी व कुडाळ या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी कोल्हापूर परिमंडळात उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

Advertisement

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या दर्जेदार वैद्यकीय सुविधा, रुग्णांची सर्वाधिक संख्या तसेच गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा या बाबींचा विचार करून या रुग्णालयाला कोल्हापूर परिमंडळात द्वितीय क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.

याबाबत समाधान व्यक्त करताना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले की, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने सातत्याने दर्जेदार आरोग्यसेवा दिली आहे. या यशामागे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची मेहनत असून, सावंतवाडी तालुक्यातील नागरिकांनी रुग्णालयावर दाखविलेल्या विश्वासाचे हे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.