तुर्कियेच्या किनाऱ्यावर मिळाले सर्वात जुन्या जहाजाचे अवशेष
4700 वर्षांपूर्वी बुडाले होते जहाज
पुरातत्वतज्ञांनी समुद्रात बुडालेल्या सर्वात जुन्या जहाजाचे अवशेष शोधून काढल्याचा दावा केला आहे. तुर्कियेच्या किनाऱ्यानजीक जगातील सर्वात जुने बुडालेले जहाज मिळाले आहे. तज्ञांनी हे जहाज 4400 ते 4700 वर्षांपूर्वीचे असल्याचा निष्कर्ष काढला आहे. म्हणजेच हे जहाज प्रारंभिक कांस्ययुगातील आहे. त्या काळात इजिप्तचे ग्रेट पिरॅमिड तयार होत होते. या जहाजाची लाकडी संरचना शिल्लक राहिली नसून त्यात ठेवण्यात आलेली मातीची भांडी समुद्रतळावर सापडली आहेत. काही भांड्यांमध्ये अद्याप आत ठेवण्यात आलेल्या गोष्टींच्या खुणा आहेत. अवशेष शोधणाऱ्या पुरातत्वतज्ञांनुसार हे सुमारे 10 मीटर लांब आणि भूमध्य समुद्रात सामग्री वाहून नेणारे व्यापारी जहाज होते. हे अवशेष तुर्कियेच्या अंताल्यामध्ये केकोवा बेटाच्या किनाऱ्यानजीक मिळाले आहेत. जहाजाशी निगडित गोष्टी पाण्यात एका ठिकाणी विखुरलेल्या मिळाल्या.
एकप्रकारचे टाइम कॅप्सूल
भूमध्य समुद्रीय पुरातत्व टीम अभियानाचे नेतृत्व करणारे तुर्कियेच्या अकदेनिज युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हाकान ओनज यांनी हे बुडालेले जहाज समुद्राच्या तळाला एक ‘टाइम कॅप्सूल’प्रमाणे असल्याचे म्हटले आहे. तज्ञांना तेथे दगडाचे तीन मोठे अँकर आणि मातीची 30 हून अधिक भांडी मिळाली असून त्यांना एम्फोरा म्हटले जाते. जहाजाचा लाकडी हिस्सा शिल्लक न राहिल्याने रेडिओकार्बन डेटिंगसारख्या तंत्रज्ञानांचा वापर करून त्याचा कालावधी ठरविता येत नाही. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे जैविक पदार्थांमधील कार्बनच्या एका रुपाला मापले जाते.
समुद्रात मिळालेली भांडी खास
केकोवामध्ये मिळालेली मातीची भांडी खास प्रकारची आहेत. यात दोन हँडल, मध्येच उभार आणि सपाट आधार आहे. हे डिझाइन इजिप्त आणि अरबमध्ये मिळालेल्या एम्फोराशी मिळतेजुळते आहे, ज्यांचा कालावधी 4400-4700 वर्षांपूर्वीचा आहे. सजावटीच्या पद्धतींची तुलना केल्यास अवशेष 100 टक्के प्रारंभिक कांस्य युगातील असल्याचे म्हटले जाऊ शकते. अभियानात सामील पाणबुड्यांनी ही भांडी पृष्ठभागावर आणली. हजारो वर्षांपर्यंत पाण्याखाली राहिल्यावर आता त्यांना संरक्षित केले जातेय. ऑस्ट्रेलियाच्या मॅक्वेरी युनिव्हर्सिटीच्या पुराततत्वतज्ञ कॅरिन सोवाडा यांनी भांडी सुस्थितीत होती असे सांगितले.
भांड्यांचा कशासाठी वापर
या एम्फोरामधून काय नेण्यात येत होते याचा शोध संशोधक घेत आहेत. यातून तेल नेण्यात येत असावे किंवा वाइन देखील असू शकते, संबंधित स्थळी पोहोचल्यावर लोक ही भांडी रिकामी करत असावेत आणि अनेक वर्षांपर्यंत याचा वापर केला जात राहिला असावा असे सोवाडा यांचे सांगणे आहे. हे बुडालेले जहाज आणि त्यातील सामग्री प्राचीन जागतिक व्यापाराविषयी माहिती पुरवित आहे. जहाजाने भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावरून स्वत:चा प्रवास सुरु केला होता. ही सामग्री प्राचीन शहर ट्रॉय येथे नेण्यात येत असावी किंवा क्रीटमध्ये मिनोअन लोकांकडे नेण्यात येत असावी असे पुरातत्वतज्ञांचे सांगणे आहे.
कसे बुडाले जहाज
केकोवामध्ये झालेला हा शोध याला जगातील सर्वात जुन्या बुडालेल्या जहाजांच्या यादीत सर्वात वर ठेवते. यापूर्वी हा विक्रम दक्षिण ग्रीसच्या डोकॉस बेटानजीक मिळालेल्या एका बुडालेल्या जहाजाच्या नावावर होता. ते जहाज 4200 वर्षे जुने होते. तर सर्वात जुने ज्ञात बुडालेले जहाज बुल्गारियाच्या किनाऱ्यानजीक काळ्या समुद्रात मिळाले होते, जे 2400 वर्षे जुने होते आणि यातील काही लाकूड अद्याप सुरक्षित आहे.
