For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

4 कोटी वर्षांपूर्वीच्या प्राण्याचे मिळाले अवशेष

06:49 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
4 कोटी वर्षांपूर्वीच्या प्राण्याचे मिळाले अवशेष
Advertisement

खोदकामादरम्यान झाली रहस्याची उकल  ;  वैज्ञानिक देखील झाले अचंबित 

Advertisement

जगाचे प्राचीन रहस्य हे केवळ आकाशात नव्हे तर भूगर्भात देखील दडलेले आहे. वैज्ञानिक आज देखील कोट्यावधी वर्षे जुन्या रहस्याची उकल करू पाहत असतात. अलिकडेच वैज्ञानिकांना सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर राहत असलेल्या एका प्राण्याचे अवशेष मिळाले आहेत. हा प्राणी डायनासोरपेक्षाही पूर्व पाण्यात राहायचा आणि याचा आकार अत्यंत मोठा होता.

वैज्ञानिकांना नामीबियात एका प्राचीन काळातील सांगाडा मिळाला आहे. वैज्ञानिकांनी या जीवला गेईसिया जेन्निये नाव दिले आहे. गाई-एस फॉर्मेशनमुळे हे नाव मिळाले आहे. जेनी क्लॅक या वैज्ञानिकाने याचा शोध लावला आहे. वैज्ञानिकांना या जीवाची कवटी आणि स्पाइन मिळाली असून ती संरक्षित करण्यात आली आहे.

Advertisement

सैलामेंडरसारखा हा किडा हिमयुगाच्या काळातील सर्वात धोकादायक शिकार मानला जायचा, जो स्वत:च्या शिकारीला जबड्यात खेचून घेत गिळून टाकायचा. जीवाची कवटी 2 फूट लांब होती आणि त्याचे शिर एखाद्या टॉयलेट सीटसारखे मोठे आणि सपाट आकाराचे होते. हा जीव 40 दशलक्ष वर्षांपूर्वी सरोवर किंवा दलदलयुक्त भागांमध्ये असायचा. शिकागोच्या फील्ड म्युझियमचे पोस्टडॉक्टोरल फेलो जेसन पार्डो यांनी याची माहिती दिली आहे.

या जीवाच्या शिराचा पुढील हिस्सा केवळ दातांचा होता आणि याचा फँग देखील असायचा. वैज्ञानिकांनुसार हे अत्यंत मोठे शिकारी असायचे, परंतु त्यांची चाल अत्यंत मंद राहिली असावी. युनिव्हर्सिटी ऑफ ब्यूनोज एरीजच्या क्लॉडिया मॅरसिकानो यांनी या प्राण्याचा सांगाडा पाहताच हा अत्यंत वेगळा आणि अनोख शोध असल्याचे कळले असल्याचे म्हटले आहे. कवटीचे अध्ययन केले असता समोरील हिस्सा पाहून चकितच झालो. इंटरलॉकिंग फँग दिसून आले, ज्यातून हा प्राचीन टेट्रापॉड प्रजातीचा जीव असल्याचे स्पष्ट झाले. टेट्रापॉड जीवांमध्ये कण्याचे हाड असायचे आणि ते चार पायांचे असायचे, परंतु मगरीच्या प्रजातीशी त्यांचा संबंध असायचा. त्यांच्यातून रेप्टाइल, पक्षी, सस्तन आणि उभयचर प्राणी तयार झाले हेते.

Advertisement
Tags :

.