महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

2000 वर्षे जुन्या फळाचे मिळाले अवशेष

06:51 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डब्लिनच्या ड्रूमनघमध्ये उत्खननादरम्यान लागलेल्या एका महत्त्वपूर्ण शोधामुळे रोमन साम्राज्य आणि आयर्लंडदरम्यान हजारो वर्षांपूर्वी होणाऱ्या व्यापाराविषयी अनेक महत्त्वपूर्ण पैलू समोर आले आहेत. अखेर दोन्ही देश कशाप्रकारे वस्तूंचा वापर करत होते हे यातून स्पष्ट झाले आहे.

Advertisement

युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिनच्या अहवालानुसार अंजीर या क्षेत्रात उत्खननातून मिळालेल्या विविध वस्तूंपैकी एक आहे. याचबरोबर धातू आणि चिनी मातीच्या वसतू तसेच अन्य खाद्य अवशेषही प्राप्त झाले आहेत. इतक्या कालावधीपर्यंत हे खाद्य अवशेष संरक्षित राहिले कारण ते जळालेले होते.

Advertisement

हे प्राचीन अंजीर रोमन साम्राज्य आणि आयर्लंडदरम्यान आदान-प्रदान करण्यात येणाऱ्या वस्तूंविषयी नवी माहिती प्रदान करते. प्राचीन खाद्य शोधसमूहाचे संचालक प्राध्यापक मेरियल मॅकक्लेची यांच्यानुसार मध्ययुगीन डब्लिन, कॉर्क आणि अन्य शहरांमधील उत्खननात 13 व्या शतकातील अंजीरचे बीज आढळून आले आहेत.

अत्यंत जुन्या फळाच्या अवशेषांचा शोध

पहिल्यांदाच आयर्लंडमध्ये कुठल्याही प्राचीन फळाचा शोध लागला आहे. रोमन साम्राज्य आणि आयर्लंडदरम्यान व्यापार मार्गांनी अन्नसामग्री आणि अन्य खाद्यसामग्रीच्या आदान-प्रदानाला सुलभ केले हेते. या शोधापूर्वी संशोधकांनी अंजीर हजारो वर्षांपूर्वी आयर्लंडमध्ये पोहोचले होते हे माहित नव्हते.

हजारो वर्षांपूर्वीचे राहणीमान

फिंगल काउंटी कौन्सिलमध्ये हेरिटेज अधिकारी आणि पुरातत्व तज्ञ क्रिस्टीन बेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या उत्खननात खाद्य अवशेषांसोबत अनेक प्राचीन वस्तूही मिळाल्या आहेत. या शोधांमुळे संशोधकांनी हजारो वर्षांपूर्वी आयर्लंडमध्ये लोकांच्या राहणीमानाविषयी संकेत मिळाले आहेत. रोमन विजयाच्या पहिल्या 200 वर्षांदरम्यान रोमनचे ब्रिटनच्या चेस्टर क्षेत्रासोबतचे संबंधही यातून समजू शकतात. अंजीरसोबत आयर्लंडमध्ये अन्य पुरातत्व शोधांमध्ये एका शेतकऱ्याकडून  काउंटी डोनेगलमध्ये शोधण्यात आलेला बोग बटरचा 60 पाउंडचा स्लॅब देखील सामील आहे. परंतु या क्षेत्रात बोग बटर एक असामान्य शोध नाही, परंतु हा विशेष स्लॅब स्वत:च्या आकारासाठी उल्लेखनीय होता, जो आयर्लंडमध्ये आतापर्यंत आढळलेल्या सर्वात मोठ्या तुकड्यांपैकी एक आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article