कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुरक्षेच्या कारणास्तव आयपीएलचे उर्वरित सामने रद्द

12:32 PM May 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पाकिस्तान सरकार हे दहशतवाद्यांच्या हाताचं बाहुलं आहे हे सर्व जगाला माहिती आहे. त्यात भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांचा पाकिस्तान सरकारवर दबाव वाढल्याने दुष्कृत्य सुरु केलं आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानने भारतातील अनेक शहरांना लक्ष्य करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ले चढवले होते. पण भारताने प्रत्येक हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं. पण याचा प्रभाव आयपीएल स्पर्धेवर झाल्याचं दिसून आलं आहे. सीमेपासून 150 किमी लांब असलेल्या धर्मशाळेत पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु होता. हा सामना अर्धवट स्थितीत थांबवावा लागला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला.याच पार्श्वभूमीवर 9 मे रोजी बीसीसीआयच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उर्वरित आयपीएलचे सामने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . त्यामुळे आयपीएल २०२५ चे सामने खेळाडूंच्या सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# ipl 2025 # india vs pakistan # tarun bharat news sindhudurg
Next Article