दैवज्ञ गणपती मंदिरात उद्यापासून धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी उभाबाजार येथील श्री देव दैवज्ञ गणपती मंदिरात 36 व्या वर्धापन दिनानिमित्त गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच सालाबाद प्रमाणे माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता गणपती मूर्ती श्रीची पूजाअर्चा, वाढदिवस, गणपती अथर्वशीर्षसहस्त्रा वर्तने,जप व हवन व रात्रौ भजन गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी श्रींची पूजा अर्चा, अभिषेक वगैरे सकाळी 10:30 वाजता गणेश जन्मावर किर्तन, दुपारी बारा वाजता गणेश जन्म , दुपारी 12:30 ते रात्रौ नऊ वाजेपर्यंत गणेश नामजप व रात्रौ नऊ नंतर भजन शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी सकाळी श्री नारायण स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्रींची पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुका पूजन सकाळी ११ वाजता पावणी व त्यानंतर महाप्रसाद व रात्रौ भजन तर शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी बालाजी मठात श्रींची पूजाअर्चा व नंतर स्वामींची समाधी व पादुकापूजा, अभिषेक व रात्रौ भजन आदी कार्यक्रम असून भाविकांनी हजर राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दैवज्ञ गणपती मंदिर उत्सव समितीने केले आहे.