कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कास येथील महालक्ष्मी मंदिरात २८ फेब्रुवारीपासून धार्मिक कार्यक्रम

03:56 PM Feb 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

कास येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिर शतक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त 28फेब्रुवारी, 1मार्च व 2 मार्च पर्यंत विविध धार्मिक व सास्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी सायंकाळी 8 वाजता सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. या निमित्ताने शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते 9 प्रायश्चित विधी, देवतांना निमंत्रण, प्रधान संकल्प, गणेश पूजन पुण्याहवाचन, आचार्य वरण, सकाळी 9 ते 1 स्थलशुद्धी, मुखदेवता स्थापन पूजन, संप्रोक्षण विधी, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 ग्रामस्थांचे भजन,महिलांची फुगडी, सायंकाळी 6.30 वाजता आरती, सायंकाळी 7 वाजता खेळ झिम्मा फुगडी चा सादरकर्ते श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ, रात्री नऊ वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस यांचा दणदणीत नाट्य प्रयोग होणार आहे. शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी 8 ते 1 स्थलशुद्धी, आवाहीत देवता पूजन, कुंकूमार्जन, शतचंडी अंगभूत सप्तशती पाठ वाचन, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 ग्रामस्थांचे भजन, महिलांचे फुगडी, सायंकाळी 6.30वाजता आरती, सायंकाळी 7 वाजता श्री ह भ प श्री पुरुषोत्तम बुवा भाटावडेकर यांचे सुश्राव्य कीर्तन, रात्री नऊ वाजता खेळ पैठणीचा गाव मर्यादित सूत्रसंचालक समीर चराटकर असे कार्यक्रम आहेत. रविवार दिनांक 2 मार्च रोजी धार्मिक विधी, सकाळी 8 ते 9 देवता पूजन सप्तशती पाठहवन , सकाळी 9 ते 11:30 कुमारीका पूजन, बलिदान पूर्णहुती, कुष्मांड बलिदान, दुपारी 12 वाजता आरती, दुपारी 1 ते 3 महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 ग्रामस्थांचे भजन, महिलांची फुगडी, सायंकाळी 6 वाजताआरती, रात्री 8 वाजता सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर रात्री 10:30 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा मेहंदीपुरचा बालाजी हा ट्रिकसिन युक्त नाट्य प्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन कास ग्रामस्थ यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news # kas #
Next Article