स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर डेगवे येथे उद्या महाद्वार अर्पण सोहळा
सावंतवाडी । प्रतिनिधी
48 गावचे जागृत दैवत श्री.स्थापेश्वर महालक्ष्मी मंदिर डेगवे येथे मंदिरातील तुळशी वृंदावनाचे उद्यापन आणि मंदिरासमोरील नविन महाद्वार श्री.स्थापेश्वर चरणी अर्पण करण्याचा सोहळा शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजता सुरू .होणार आहे. या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे प्रमुख अतिथी आणि इतर मान्यवर असणार आहेत. देवस्थानचे सर्व मानकरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सकाळी 8 वाजता देवावर अभिषेक,महाद्वार पूजन., तुलसीवृंदावन उद्यापन सोहळा,प्रसाद होणार असून भाविकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन देवाचे आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन स्थापेश्वर देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.श्री.स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा पहिला सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या जत्रोत्सवाला देखील उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .