देव मुळपुरुष समंध भवानी मंदिर वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम
12:55 PM Dec 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
वेंगुर्ला -
Advertisement
वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर येथील श्री देव मुळपुरुष समंध भवानी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यनारायण महापूजेसोबतच दुपारी १. ३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 6.30 वाजता श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग यांचा संगीत स्वर रजनी , रात्री 8 वाजता संगीत भजन , तर रात्री साडेनऊ वाजता चेंडवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवटी यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळा मालवणकर यांनी केले आहे.
Advertisement
Advertisement